मुंबई : आपले संपूर्ण जीवन केवळ देश, मातृभूमी आणि स्वातंत्र्यासाठी झोकून देणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंतीनिमीत्त सायन स्टेशन वरून हिंदू महासभा, धारावी शाखेच्यावतीने, हिंदूसंघटक, “स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर” यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्ताने, शनिवार दि. २८/०५/२०२२ या दिवशी, धारावी विभागात “हिंदू एकता दिन” साजरा करून फेरी काढण्यात आली.
सावरकर लहानपणापासून बुद्धिमान होते,आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून, मारिता मारिता मरेतो झुंजेन” अशी शपथ त्यांनी घेतली.
हिंदू महासभेचे मुंबई अध्यक्ष अनुप जी केणी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पर्पण करून अभिवादन केले. फेरीमध्ये देशभक्ती गीते लावुन, भारत माता की जय, वंदे मातरम्, जय हिंदूराष्ट्र, स्वा. सावरकर की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, इत्यादी घोषणा देण्यात आल्या.
हिंदू एकता दिन साजरा करण्यासाठी हिंदू महासभेचे पदाधिकारी दिलीप मेहेंदळे, पांडुरंग पवार, गणेश कदम, रमेश कराळे, अशोक पवार, प्रवीण गर्जे, महेंद्र कदम, कुमार कदम, योगेश गवाणकर, आकाश सोनावणे, मल्लिकार्जुन बोडा, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रभाकर शिंदे, वज्रदल संघटनेचे प्रभाकर चिट्टीमिल्ला, विमालचंद जैन आणि मोठ्याप्रमाणावर इतर हिंदूंचा सहभाग होता.
सदर फेरीची सुरुवात शीव रेल्वे स्थानकपासून ते धारावी विभागातील वेगवेगळ्या मार्गाने, श्री धारेश्वर शिव मंदिर, संत कक्कया मार्ग येथे समारोप झाला. मुंबई तरुण भारत चे जितेंद्र सोनवणे यांनी समारोपच्या ठिकाणी सरबत वाटप केले.

