थॅलेसेमिया रूग्णांसाठी रक्तदान १२८ पिशव्या रक्त जमा

मुंबई : रूग्ण मित्र संचलित रूग्ण कल्याण सामाजिक सेवा संस्था, युनिक ब्लड मोटीव्हेटर्स, जीवनदाता सामाजिक संस्था, जनता जागृती मंच, थॅलेसेमिया निर्मूलन समिती, ग्लोबल रक्तदाते, आम्ही मालवणी रक्तदान समिती, संडे फ्रेंडस, एचडीएफसी बॅक इत्यादींच्या संयुक्त विद्यमाने सायन रूग्णालय रक्तपेढी येथे रक्तदान मोहिम आयोजित करण्यात आली होती. नववर्षाची सुरूवात थॅलेसेमिया रूग्णांसाठी रक्तदान करून करण्यात आली असून यावेळी १२८ पिशव्या रक्त जमा झाले.
यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, अधिष्ठाता डाॅ. मोहन जोशी, थिंक फाउंडेशनचे विनय शेट्टी, निर्माते ब्लडी फास्ट अॅप अजित वहाडणे, माजी नगरसेवक वीरेंद्र तांडेल, रूग्ण मित्र विनोद साडविलकर, संदिप तवसाळकर, सहाय्यक सुरक्षा अधिकारी सुशिल सहानी, मुख्य समाजविकास अधिकारी प्रकाश गायकवाड, रक्तमित्र जय साटेलकर, अमोल सावंत, गजानन नार्वेकर, मनिष सावंत, गणेश आमडोसकर, प्रशांत म्हात्रे, राजेंद्र ढगे, महेश जाधव, रमेश चव्हाण, किरण गिरकर, सायन रक्तपेढीच्या सुनीता घमंडी, आनंद सरतापे, अमित सावंत, सचिन जगदाळे, मानसिंग चव्हाण, सूरज चौगुले, विशाल दिवटे, सॅमसन जगलोर, राकेश बोरगरकर, विक्रम काळे, महेंद्र खेडेकर, कौशिक वाडकर, उल्हास पाणमंद, प्रशांत म्हात्रे, राजकुमार राठोड तसेच आयोजक व मान्यवरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन नवीन वर्षाचे स्वागत केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com