मुंबई : महाराष्ट्रातील थोर सामाजसेवक, लेखक, चित्रकार, छायाचित्रकार, नाटककार, इतिहासकार, प्रखर राष्ट्राभिमानी, प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनी केलेल्या प्रबोधन नियतकालिकेचे यंदाचे शताब्दी वर्ष आहे.
प्रबोधनकारांच्या पुस्तकांचा अनमोल खजिना शाळा – महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवा, त्यांना प्रबोधनकरांनी १०० वर्षापूर्वी लिहिलेल्या आल्या ज्वलंत विचारांची माहिती व्हावी म्हणून शिवसेना – युवासेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ आणि युवा व्हिजन च्या वतीने शाळेतील / महाविद्यालयातील प्राचार्यांना प्रबोधनकारानी लिहिलेल्या प्रखर व ज्वलंत विचारांच्या पुस्तकांचा संच मेकीचन हॉल, विल्सन महाविद्यालय समोर, गिरगाव चौपाटी येथे विनामूल्य भेट देण्यात आले सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र भरातून महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राचार्य उपस्थित राहिले होते. ह्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. ना. श्री. सुभाष देसाई – उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य, मा. श्री. अरविंद सावंत – खासदार, मा. प्रा. डॉ. तुकाराम शिवारे महाविद्यालयीन प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष, श्री. रवींद्र मिर्लेकर शिवसेना उपनेते, सौ. मीनाताई कांबळी उपनेत्या व मुंबई विद्यापीठातील सर्व युवासेना सिनेट सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचा आयोजन विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, महिला विभाग संघटक जयश्री बाळलिकर, युवासेना विभाग अधिकारी प्रथमेश सकपाळ यांनी केले होते.
