मुसळधार पावसात मनसे नेते आणि कार्यकर्ते धरण्यावर बसले,

मुंबई: मुंबईतील साकीनाका सफेद पूल वार्ड क्र.१६२ भागात नाल्याची दुरुस्ती व साफसफाईचे काम पूर्ण न झाल्याने संतप्त मनसे कार्यकर्ते मुसळधार पावसात रस्त्यावर बसले. खरं तर, मनसे कार्यकर्त्यांचा असा आरोप आहे की मलनिःसारण आणि सुरक्षा भिंत पूर्ण न झाल्यामुळे सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. यामुळे एखादा मोठा अपघात किंवा स्थानिक नागरिकांच्या जीविताला छळ पोहचु शकते. बीएमसीच्या भ्रष्टाचारामुळे ही सुरक्षा भिंत बनवता आली नाही. कोणताही मोठा अपघात होऊ नये आणि कोणीही मारले जाऊ नये, म्हणून मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली हे भर पावसात खुर्ची घेऊन रस्त्यावर बसले. सदर घटनेबद्दल बोलताना श्री. भानुशाली यांनी सांगितले की मी मेलो तरी बेहत्तर पण माझ्या जनतेची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची आहे ! प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना मलाईदार कामाचे नारळ फोडण्यातून वेळ मिळत नाही जनता गेली नाल्यात हे कालच मी जाहीर केलं होतं. प्रभाग क्र.१६२ नाल्यावरील संरक्षण भिंत ढासल्याची कल्पना सर्वांना दिलेली होती आणि योगायोग आज सुरू मुसळधार पाऊस म्हणजे धोक्याची घंटा…पाण्याचा प्रवाह एवढा मोठा की एखादा त्यात सापडला तर थेट नाल्यात जीव जाईल.याच भान राखून मी स्वतः जनतेच्या संरक्षणासाठी खुर्ची टाकून सलग ०३ तास ठाण मांडून बसलो.शेवटी साकिनाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक – मा.श्री.बळवंत देशमुख यांनी दखल घेऊन त्याठिकाणी संरक्षण बॅरिकेट उभे केले. त्याबद्दल साकिनाका पोलीस ठाण्याचे मनसे आभार ! व माझ्या सोबत असलेल्या अशोक जाधव- स्थानिक शाखा अध्यक्ष, बापू पांचाळ, दिनेश चाळके, विशाल कुबल ह्या सर्व मनसे कार्यकर्ते यांचे धन्यवाद !

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com