आज रामपूर,ता. चिपळूण येथे पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या हस्ते आमदार भास्करराव जाधव जी यांनी आयोजित केलेल्या सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ११०० युवक युवतींची यावेळी नोंदणी झाली. भूमिपुत्रांना रोजगार मिळावा ही शिवसेनाप्रमुखांची अग्रगण्य भूमिका होती. त्यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी परिवहन मंत्री अनिल परब जी, आमदार भास्कर जाधव जी, शेखर निकम जी, योगेश कदम जी, जिल्हापरिषद सदस्य विक्रांत जाधव जी, रोहन बाणे जी, सचिन कदम जी आणि जिल्हा प्रमुख विलास चाळके जी उपस्थित होते.

Nice