मुंबई : शिवसेना युवासेना दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ च्या वतीने कंगना राणावत ने केलेल्या दशद्रोही विधानाच्या विरोधात दक्षिण मुंबई चे खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, उपनेत्या मीनाताई कांबळी, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, विभाग संघटक जयश्री बाळलिकर, नगरसेविका सुजाता सानप यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे स्वाक्षरांची मोहीम सुरू करण्यात आली त्याचप्रमाणे कंगना राणावत हीचा पद्मश्री किताब काडून घेण्यात यावा अशी मागणी नागरिकांच्या सह्यांसहित भारताचे महामहीम राष्ट्रपती यांच्या कडे करण्यात येणार आहे व तिच्या विरोधात देशद्रोही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पोलीस उपायुक्त हरिबालाजी यांच्या कडे करण्यात आली, त्या प्रसंगी शिवसेना युवासेना पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्वाक्षरी केल्या.
