राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते संदीप अविनाश कदम यांचा कोविड योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.

मुंबई : धगधगती मुंबईच्या ११ व्या वर्धापनदिना निमित्त राजभवन येथे आयोजित कोविड यौद्धा सन्मान सोहळ्यात महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते संदीप अविनाश कदम यांचा कोविड योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. संदीप कदम यांनी कोरोना काळात सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन गरजूंना अन्न धान्य किटचे वाटप केले, स्वतःच्या घरचे रेशन गरजू ना वाटप केले, मास्क सॅनिटाझेर,अर्सनीक अल्बम गोळ्यांचे वाटप केले, आयुर्वेदिक काढा ची पॅकेट वाटप, मेडिकल कॅम्प, पोलीस व वाहतूक पोलीस यांना जेथे बंदोबस्तला होते तेथे जाऊन चाय व नास्ता वाटप करण्यात कसोशीने प्रयत्न केला, घरोघरी जाऊन कोविडं बद्दल माहिती देऊन जनजागृती केली, कोविडं रुग्णाना हॉस्पिटल मध्ये रक्ताचा पुरवठा, हॉस्पिटलमध्ये काही अडचणी येत होत्या तर त्या गोष्टीला मदत केली, कोविडं काळात एक ही दिवस घरात नसून दिवस रात्र लोकांची मदत केली, वेळोवेळी मनपा ला सांगून औषध व धूर फवारणी करून घेण्यात आली या सर्व सामजिक कार्याची परिणीती कोविड योद्धा पुरस्कार हा सन्मान देऊन झाली. या वेळी सदर कार्यक्रमास खासदार राहुल शेवाळे, नगरसेवक वसंत नकाशे , नगरसेविका हर्षला आशिष मोरे, भीमराव धुळप तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी – उमेश मुरकर

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com