दिल्ली : राष्ट्रपती राम नाथ कोविन्द येत्या १३ ते १५ जून २०२२ दरम्यान कर्नाटक आणि गोव्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
१३ जून रोजी राष्ट्रपती बंगळुरू इथल्या राष्ट्रीय लष्करी प्रशिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सव समारंभात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत.
तर, १४ जून रोजी बंगळुरूलाच, वसंतपुरा भागात, वैकुंठ हिल परिसरात, श्री राजाधिराजा गोविंद मंदिराचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.
१५ जून रोजी, राष्ट्रपतींच्या हस्ते, गोव्यातील नव्या राजभवन परिसराचा कोनाशिला समारंभ होईल. त्यानंतर ते दिल्लीला प्रस्थान करतील.