माझी धारावी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जेष्ठ नागरीकांना “कोरोना लस”

माझी धारावी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत
महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेसाठी जेष्ठ नागरीकांना “कोरोना लस” याचे महत्व घरोघरी जाऊन सांगून,आपण लस घेतली आहे का?, नसेल तर लवकर घ्या! असे सांगितले. शिवसेना शाखा क्र.१८६ विभागातील ५० ते ६० जेष्ठ नागरिकांचे नाव,आधार कार्ड नंबर घेऊन त्यांना माहिती देऊन सहकार्य करा अशी विनंती केली सदर विभागात प्रतिसाद चांगला मिळत असून यावेळी युवासेना धारावी विधानसभा पदाधिकारी यांनी पुढे येऊन “कोरोना लस” याविषयी जनजागृती केली.
ह्यात मोलाचे सहकार्य सार्वजनिक आरोग्य समिती, उपाध्यक्ष, नगरसेवक श्री. वसंत नकाशे, उपविभागप्रमुख. श्री.राजेंद्र सूर्यवंशी, शाखाप्रमुख. श्री किरण काळे, युवा विधानसभा समन्वयक सतीश सोनवणे, तेजस वैती, श्री.सागर बोबडे ( युवा शाखा अधिकारी) १८६, श्री.किशोर शिंदे ( उपशाखा युवा अधिकारी), श्री.अजित बागडे ( उपशाखा युवा अधिकारी), श्री.प्रसाद बोबडे ( उपशाखा युवा अधिकारी), श्री.हेमंत नाचरे (युवा गट अधिकारी), श्री.संतोष साळुंखे ( युवा गट अधिकारी), श्री.महेश कवडे ( सोशल मीडिया शाखा समन्वयक ), श्री.रोहित खैरे (युवा विभाग अधिकारी) (शिवसेना सोशल मीडिया धारावी विधानसभा समन्वयक)

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com