मुंबई : महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी च्या विधि, मानवी हक्क व आर.टी.आय. विभागामार्फत दि. २५ मार्च २०२२ रोजी ठिक १०:३० वा. राजीव गांधी नॅशनल सेंटर फॉर लीगल ऐड आणि असिस्टंस चे उदघाटन करण्यात आले तसेच कॉग्रेस पक्षात वकिलांच्या नियुक्त्या आणि काही पदाधिकार्यांच्या निवडी अशा कार्यकमाचे आयोजन टिळक भवन, दादर येथे कॉग्रेस पक्षाच्या प्रदेश मुख्य कार्यालयात आयोजन केले होते. या कार्यक्रमाला ॲड. विपुल माहेश्वरी, वकील सर्वोच न्यायालय, दिल्ली तथा ऑल इंडिया काँग्रेस कमिटी, विधी,मानवी हक्क, आर. टी.आय विभाग सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे प्रवक्ते अतुल लोंढे, जस्टीस ठिपसे व इतर मान्यवरांची उपसथिती होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे विधि, मानवी हक्क व आर.टी.आय. विभागाचे अध्यक्ष यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत ॲड. नंदलाल एम त्रिंबके ( वकील – मुंबई उच्च न्यायालय) यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (विधी,मानवी हक्क, आर. टी.आय) विभागाच्या प्रदेश सरचिटणीस पदी तसेच सह-प्रभारी सीबीडी बेलापूर, पनवेल, ठाणे, अलिबाग न्यायालये) अशी नियुक्ती करण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष राजकीय सामाजिक, क्रीडा,सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या ॲड. नंदलाल एम त्रिंबके यांचे काँग्रेस पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांकडून तसेच सर्व क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांचे विशेष कौतुक होत असून, त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचाली साठी सर्व स्तरावरून त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत.