युवा स्किल कौशल्य विकासाकडून रोजगाराकडे युवासेना धारावी विधानसभा यांच्याकडून मिळणार युवकांना रोजगाराची संधी

मुंबई: धारावी विधानसभेत युवासेना शाखा क्र. १८४ आणि १८५ मध्ये आढावा बैठक पार पडली. या बैठकी मध्ये युवा स्किल कार्यक्रमासंदर्भात शाखानिहाय पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन दिले गेले व युवासेना धारावी विधानसभा पदाधिकारी/युवासैनिक पक्ष बांधणी तसेच युवासेनेच्या शिक्षण आरोग्य रोजगार ह्या वाक्याला उद्देशुन कार्य करणे इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.
ह्या बैठकीला शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, युवासेनेचे धारावी विधानसभेतील सर्व पदाधिकारी, युवासैनिक उपस्थित होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना रोहित खैरे – युवा विभाग अधिकारी, यांनी कोर्सचे वैशिष्ट्य व त्याच बरोबर त्याचा आपल्या विभागातील मुलांना भावी आयुष्यात विविध क्षेत्रात होणाऱ्या फायद्याबद्दल मार्गदर्शन केले. व या कोर्स बद्दल पूर्णतः मोफत आहे, ऑनलाईन प्रशिक्षण, ६ महिने ट्रेनिंग. ६ महिने इंटनशिप. दिवसातून कोणत्याही १ तासाची निवड आपण करू शकता. कोर्सचे प्रमाणपत्र मिळेल. इच्छुक विद्यार्थ्यांनी www.yuvaskill.com या संकेस्थळावर जाऊन आपले नाव रजिस्टर करावे. या संदर्भात सविस्तर माहिती दिली.
याप्रसंगी सुरेश जाधव -शाखाप्रमुख शाखा क्रमांक,१८५, सौ.आरती गणेश चिपळूणकर, महिला शाखा संघटक शाखा क्रमांक.१८५, विधानसभा समन्वयक- सतीश सोनावणे , चेतन सुर्यवंशी , तेजस वैती , रवी संकटोल उपविभाग युवा अधिकारीपदी विनोद डोईफोडे अमोल चौगुले सन्नी शिंदे विधानसभा चिटणीस- मंगेश रणदिवे, शैलेश शिंदे, श्रीधर गोगीकर, शाखा युवा अधिकारी शिवा मैत्री ( शाखा क्र .१८४ ) , शाखा समन्वयक मनिष जाधव ( शाखा क्र .१८४ ). शाखा युवा अधिकारी साजन सर्कले ( शाखा क्र .१८५ १८५ ) , शाखा समन्वयकपदी व्यंकटेश देवेंद्र व युवासेना शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. प्रतिनिधी – उमेश मुरकर

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com