मुंबई : “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” ही उक्ती फक्त बोलण्यापुरता मर्यादित न ठेवता ती कृतीतूनही जगली पाहिजे, ह्याच सामाजिक जाणिवेतून भाजप शिवडी विधानसभा अध्यक्ष दिलीप धुरी, महामंत्री सचिन शेट्ये, महिला वॉर्ड उपाध्यक्षा राखी शेट्ये, महामंत्री सचिन भोसले तसेच स्थानिक वॉर्ड अध्यक्ष व पदाधिकारी ह्यांच्या नियोजनाने शिवडी विधानसभेतील नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवेचा उदघाटन सोहळा रविवार दि १३ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी गुरुराणी चौक के. इ. एम. रूग्णालय येथे करण्यात आला.
भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, कालिदास कोळंबकर तसेच प्रसाद लाड आदी मान्यवरांनी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवली. त्यांच्यासोबत मुंबई उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, दक्षिण मुंबई जिल्हा महामंत्री राजेश मिश्रा, दक्षिण मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सतीश तिवारी, दक्षिण मुंबई जिल्हा सचिव सत्पाल वाभळे, नितीन पवार, दक्षिण मध्य मुंबई भाजप सचिव नितेश पवार आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते.
शिवडी विधानसभेतील सर्व वॉर्ड अध्यक्ष तसेच पुरुष व महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते ह्यांच्या अथक परिश्रमामुळे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
