नाना पटोले यांच्या अटकेची मागणी…भाजप शिवडी विधानसभा तर्फे जाहीर निषेध

मुंबई : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे. पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपच्या अनेक नेत्यांनी केली आहे. शिवडी विधानसभेतील भाजप पदाधिकाऱ्यांनीही आज, मंगळवारी पटोले यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी पटोले यांचा निषेध व्यक्त केला. भारतमाता लालबाग येथे नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. ह्या आंदोलनात भाजप मुंबई उपाध्यक्ष व बेस्ट समिती सदस्य राजेश हाटले तसेच शिवडी विधानसभेतील सर्व पदाधिकारी, वॉर्ड अध्यक्ष व महिला मोर्चा आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com