चांगले लोक रात्री अंथरुणावर शांतपणे झोपतात कारण श्री.बळवंत देशमुख यांच्यासारखे वरिष्ठ पोलीस अधिकारी कार्यरत असतात, साकिनाका पोलीस ठाण्यात नुकतीच श्री.बळवंत देशमुख यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर नियुक्ती झाली.
पोलीस ठाण्याचे कामकाज व वेळेचं गणित बाजूला ठेवताना स्वतःहुन पुढाकार घेत चांदीवली मनसे शिष्टमंडळाशी मनसोक्त संवाद साधला व साकिनाका हद्दीतील राजकीय – सामाजिक व गुन्हेगारी परिस्थितीवर सकारात्मक चर्चा केली. या चर्चेत मा. श्री.महेंद्र भानुशाली – विभाग अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली उपविभाग अध्यक्ष – संजय सो. मुळे, शाखा अध्यक्ष – अशोक जाधव, राजू साळवी, समीर कदम, किशोर कोरगावकर, महिला विभाग अध्यक्ष – संगीता लांडे महिला उप विभाग अध्यक्ष – सुजाता बागुल, महिला शाखा अध्यक्ष – सुनीता सपकाळे, जयश्री शेवाळे, नियती महाडिक यांच्या सोबत फिरोझ खान, महेंद्र केसरकर, उदय गोविंद, संतोष राणे इत्यादी मान्यवरांनी सहभाग घेतला व देशमुख साहेबाना पूढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या