शरद पवारांच्या वाढदिवशी शिवडी तालुक्यात रक्तदान शिबिर

मुंबई : रक्तदान म्हणजे जीवनदान. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने १२ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अभ्युदय एज्युकेशन सोसायटीज् हायस्कूल, काळाचौकी येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात शिवडी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहान शिवडी तालुका अध्यक्ष उमेश येवले यांनी केले आहे.
१८ ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्ती रक्तदान करू शकतात. कोविड निगेटिव्ह झाल्यानंतर २८ दिवसाने रक्तदान करता येते. कोविड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसाने तर दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसाने रक्तदान करता येते. 
कोविड संकटाच्या काळात रक्त तुटवड्यामुळे ज्यांना नियमित रक्ताची गरज भासते असे थॅलेसीमिया, सिकलसेल रुग्णांचीही गैरसोय होत आहे. गर्भवती मातांसह अपघातग्रस्तांना आपतकालीन परिस्थितीत रक्ताची गरज भासते. या स्थितीत वेळेत रक्तदाता शोधणे व त्याचा रक्तगट जुळवणे हे अतिशय जिकरीचे काम आहे. या सर्वांना जीवनदान देण्यासाठी रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे, तरच आपण खऱ्या अर्थाने जीवनदान देऊ करू शकतो. शासकीय रक्तपेढीत आज रक्ताचा ठणठणाट आहे. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करतानाही अडचणी येत आहे. कोरोना महामारी व लसीकरणामुळे अनेकांना रक्तदानाची इच्छा असूनही मर्यादा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. यात सक्रिय सहभाग घेण्यासाठी आवाहनही करण्यात येत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com