भाजपा शिवडी विधानसभेची मलिकांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई : भारतीय जनता पार्टी शिवडी विधानसभा अध्यक्ष दिलीप धुरी ह्यांच्या अध्यक्षतेखाली नवाब मलिक यांच्या विरोधात आज (२४ फेब्रुवारी) भारतमाता सिनेमाच्या समोर लालबाग येथे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मलिकांनी त्वरीत राजीनामा द्यावा ही मागणी देखील करण्यात आली.
यावेळी भाजपा मुंबई उपाध्यक्ष व बेस्ट समिती सदस्य राजेश हाटले, भाजपा सार्वजनिक उत्सव समितीचे मुंबई अध्यक्ष अरुण (भाऊ) दळवी, दक्षिण मुंबई जिल्हा उपाध्यक्ष सतीश तिवारी, सचिव सत्पाल वाबळे, नितीन पवार, दक्षिण मध्य मुंबई सचिव नितेश पवार, शिवडी विधानसभा महामंत्री सचिन भोसले तसेच शिवडी विधानसभेतील सर्व पदाधिकारी, वॉर्ड अध्यक्ष राजेश परळकर, गणेश शिंदे, पार्थ बावकर, बाळासाहेब मुढे, आनंद सावंत, सर्व महिला मोर्चा पदाधिकारी व युवा मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com