श्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य जनसेवा सप्ताहाचे आयोजन

मुंबई: युवासेनाप्रमुख, पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री श्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य जनसेवा सप्ताहाचे औचित्य साधून युवासेना धारावी विधानसभा शाखा क्र. १८३ तर्फे र. व. शेठ आयुर्वेदीक रुग्णालय सायन येथील रुग्णांना फळं वाटप व निवासी डॉक्टरांचा आणि फ्रटलाईन कर्मचारी वर्गाचा सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम आज १३ जून रोजी पार पडला
सदर कार्यक्रमाला शिवसेना विधानसभा समन्वयक विठ्ठल पवार उपविभागप्रमुख प्रकाश आचरेकर, शाखाप्रमुख सतीश कटके, शाखा समन्वयक प्रकाश सावंत, जेष्ठ शिवसैनिक दिलीप कटके, युवा विधानसभा समन्वयक चेतन सूर्यवंशी, तेजस वैती, उपविभाग अधिकारी विनोद डोईफोडे, विधानसभा चिटणीस मंगेश रणदिवे, युवासेना उपशाखा अधिकारी, गटअधिकारी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपविभाग समन्वयक गणेश खाडे व युवा शाखा अधिकारी चेतन थोरात आणि स्थानिक युवासेना पदाधिकारी ह्यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com