युवा पत्रकार मुझम्मील काझी यांना नुकतेच राज्यस्तरीय विश्व समता आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुझम्मील काझी गेली अनेक वर्ष पत्रकारितेत असुन त्यांनी डिजिटल मिडीया आणि मोबाईल जर्नालिझमने आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली.पत्रकारितेसोबतच त्यांची सामाजिक क्षेत्रात ही भरीव कामगिरी आहे. डिजिटल मिडीयामध्ये मुझम्मील काझी यांच्या अनेक बातम्या विविध वेब पोर्टेल त्याचबरोबर युट्युब चॅनलला प्रकाशित झालेल्या आहेत.काझी यांच्या डिजिटल मिडीयातील योगदानाबद्दल विश्व समता मंच लोवले,संगमेश्वर या संस्थेने दखल घेत त्यांना राज्यस्तरीय विश्व समता आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात केले. विश्व समता मंच लोवले,संगमेश्वर ही संस्था गेली १५ वर्षे सामाजिक,शैक्षणिक,कला,क्रिडा, पत्रकारिता,शैक्षणिक, जल, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांचा गौरव करत असते.
हा पुरस्कार वितरण सोहळा साळवी स्टॉप रत्नागिरी येथे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. मुझम्मील काझी यांना सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांच्या शुभहस्ते आकर्षक मानपत्र,सन्मानचिन्ह,मानाचा पट्टा देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव सर,सुनिल सुरेखा,नयना जाधव,मारुती काका जोशी,राष्ट्रपाल सावंत,कोमल शिवगण,त्याचबरोबर आनंद तापेकर,जमीर खलफे,उद्योजक आसिफ खल्पे,युगेश्री भारती व अन्य मान्यवर उपस्थित होते. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल उक्षी ग्रामस्थ,मित्रपरिवार त्याच बरोबर गाव विकास समितीचेे संगटनप्रमुख सुहास खंडागळे,अध्यक्ष उदय गोताड उपाध्यक्ष राहुल यादव व तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.