मुंबई : ठाकूर रामनारायण कला आणि वाणिज्य महाविद्यालय च्या महिला विकास सेल, दहिसर यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्वसंरक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेला प्रशिक्षक उमेश मुरकर व विघ्नेश मुरकर हे प्रमुख पाहुणे होते.तसेच आयोजन समितीत सहाय्यक प्राध्यापिका निलम गोराडिया, सहायक प्राध्यापिका रंजनी शुक्ला आणि सहायक प्राध्यापिका अपूर्वा घाडशी यांचा समावेश होता. कार्यशाळेत एकूण ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, विद्यार्थ्यांना ज्युडो, कराटे आणि किक बॉक्सिंगशी संबंधित मूलभूत स्वसंरक्षण तंत्रांचे तांत्रिक ज्ञान मिळाले. कार्यशाळा अत्यंत प्रभावी व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांना नियमित जीवनात व्यायाम आणि दैनंदिन कसरत यांचे महत्त्व समजण्यास मदत झाली. महिला दिनाला खूप महत्त्व आहे आणि आजच्या काळात ती एक प्रथा बनली आहे. हा समाजातील स्त्रियांबद्दल आदर, कौतुक, प्रेम आणि काळजीचा उत्सव आहे. आजकाल शाळा, महाविद्यालयांमध्ये महिला दिन साजरा केला जातो, ही आनंदाची बाब आहे, जेणेकरून तरुण पिढीच्या मनात लहानपणापासूनच महिलांचा आदर आणि काळजी रुजली जाईल. महिलांचे सक्षमीकरण ही मोठी जबाबदारी आहे. स्त्री-पुरुष समानतेसाठी ते आवश्यक आहे. हीच सामाजिक बांधिलकी ओळखून ठाकूर रामनारायण कला आणि वाणिज्य महाविद्यालय च्या महिला विकास सेल ने या कार्य शाळेचे यशस्वी आयोजन केले.