वाको इंडिया चिल्ड्रेन, कॅडेट्स आणि ज्युनियर्स नॅशनल किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप
कोलकाता, पश्चिम बंगाल येथे १९” ते २४ जुलै 2022 रोजी पार पडली. भारतातील २६ राज्यांनी यात सहभाग घेतला होता. या राष्ट्रीय
स्पर्धेत विन्स पाटील याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना पॉईंट फाईट व लाईट कॉन्टॅक्ट अशा दोन्ही इव्हेंट मध्ये चमकदार कामगिरी करत दोन सुवर्ण पदके पटकावली.
शितो रीयू स्पोर्टस कराटे अँड किक बॉक्सिंग असोसिएशन व स्पोर्ट किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षक उमेश मुरकर व विघ्नेश मुरकर यांच्या मार्गदर्शनाने विन्स किक बॉक्सिंग या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. पदक वितरण प्रसंगी वाको इंडियाचे अध्यक्ष संतोष के अग्रवाल व वाको महाराष्ट्राचे अध्यक्ष निलेश शेलार यांनी विन्सला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
प्रशिक्षक उमेश मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली २०२३ मध्ये होणाऱ्या एशियन इनडोअर गेम स्पर्धेत खेळण्याचा मानस विन्स पाटील याने व्यक्त केला