मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.२०६ चे प्रतिनिधित्व करणारे शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांच्या विद्यमाने घरोघरी पाण्याची टाकी साफसफाई व निर्जंतुकीकरण मोहिम घेण्यात आली आहे. २३ जानेवारी शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सदर उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमा अंतर्गत प्रभाग क्रमांक २०६ मधील सर्व इमारती, बैठ्या चाळीं मधील घराघरात असलेल्या पाण्याच्या टाक्या साफ करून देण्यात येणार आहेत.
पिण्यासाठी हवे शुद्ध पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हानी. त्याच दुषित पाण्यापासून होणारे आजार कॉलरा, हॅपेटायटिस, कावीळ, त्वचा विकार, हगवण, डायरीया आदी टाळण्यासाठी मशीनद्वारे विभागात घरोघरी जाऊन पाण्याची टाकी साफ करून निर्जंतुकीकरण करून देण्यात येणार आहे.
शिवसेना शिवडी विधानसभा शाखा क्रमांक २०६ मधील विभागीय नागरिकांनी आपली नावनोंदणी शाखेत करावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका स्थापत्य समिती (शहर) उपाध्यक्ष, विधी व कायदा समितीचे सदस्य, जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच महाराष्ट्र वाहतूक सेना उपाध्यक्ष सचिन पडवळ यांनी केले आहे.