चेन्नई मध्ये वाको इंडिया सिनियर राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेस सुरुवात, उद्घाटन कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद.

चेन्नई : जवाहर लाल नेहरू स्टेडियम येथे दिनांक १८ ते २२ दरम्यान सिनियर राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील ३० राज्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला आहे. वाको इंडिया नॅशनल सिनियर अँड मास्टर्स किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेचे उद्घाटन आज अगदी उस्फुर्त पणे जवाहर लाल नेहरू स्टेडियम येथे झाले. सदर स्पर्धेस प्रमुख पाहुणे – माननीय थिरू. शिवा.व्ही. मय्यानाथन एच,पर्यावरण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आणि तामिळनाडू सरकार, डॉ. ईशारी के गणेश – अध्यक्ष – तामिळनाडू ऑलिम्पिक असोसिएशन, संतोष अगरवाल – अध्यक्ष वाको इंडिया, तिरू. एम.एन. अरुण, संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, चेन्नई, माननीय थिरू. जिनी के.एस.मस्तान
अल्पसंख्याक कल्याण मंत्री,अनिवासी तमिळ कल्याण, निर्वासित आणि स्थलांतरित आणि वक्फ बोर्ड तामिळनाडू सरकार, डॉ. सी. सुरेश बाबू – सरचिटणीस आणि तांत्रिक समिती अध्यक्ष – प्रशिक्षक समिती (वाकोइंडिया)- हे उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com