मुंबई : झूम मीटिंग च्या माध्यमातून सर्व जिल्हा प्रशिक्षकांनी कोच एज्युकेशन कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला होता. सदर कार्यक्रमास वाको इंडिया कडून आमंत्रित पाहुणे प्रतिनिधी कार्तिक डाकुआ सर (उपाध्यक्ष वाको इंडिया) आणि सुरेश बाबू सर (मुख्य प्रशिक्षक वाको इंडिया) यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. वाको इंडियाचे अध्यक्ष संतोष अग्रवाल यांनी त्यांची नेमणूक केली होती.
एकंदर प्रशिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या प्रकारचा ताळमेळ किंवा संवाद असावा याचे संदर्भासहित स्पष्टीकरण कार्तिक डाकुआ सर यांनी सोप्या भाषेत समजाउन सांगितले. सर्व प्रशिक्षकांनी परिसंवादाचा चांगलाच आनंद लुटला आणि कार्यक्रमादरम्यान नवीन अनुभवाबद्दल त्यांचे अभिप्रायही सांगितले, प्रशिक्षण उत्कृष्ट असल्याचे त्यांनी सांगितले, या चर्चासत्राच्या महाराष्ट्रातील प्रशिक्षकांसाठी असे चर्चासत्र घडवून आणल्याबद्दल वाको इंडिया महाराष्ट्रचे अध्यक्ष निलेश शेलार सर यांचेही सर्वानी आभार मानले. स्पोर्ट्स किकबॉक्सइंग असोसिएशन मुंबई शहर या संस्थे तर्फे प्रीती शेट्टी, अनुप्रिता घाग, विघ्नेश मुरकर व उमेश मुरकर यांनी सक्रिय सहभाग घेतला





