मुंबई : एका बाजूला संघटित क्षेत्रातील, खाजगी किंवा सार्वजनिक कामगार ज्यांना नियमित पगार, वेतन, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटीच्या रुपात आणि सामाजिक सुरक्षा यासह इतर लाभ मिळतात. तर दुसर्या बाजूला लहान व सिमांत शेतकरी, शेतमजूर, सुतार, कुंभार, न्हावी, पशुपालन करणारे, आशा कामगार, अंगणवाडी सेविका, रस्त्यावरचे विक्रेते, बांधकाम कामगार, दुध उत्पादक, लेदर कामगार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, ऑटो चालक, गवंडी, लोहार, सुरक्षाकर्मी, प्लंबर, इलेक्ट्रिशियन इत्यादी काम करणारे श्रमजीवी, ज्यांना कामाच्या मोबदल्या व्यतिरिक्त कोणतेही लाभ मिळत नाहीत. त्यांनाही सामाजिक सुरक्षा मिळावी. विमा योजनांचा लाभ मिळावा याकरता आशीर्वाद चॅरीटेबल ट्रस्ट (नोंदणीकृत) यांच्या तर्फे ६ व ७ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बाल गोपाल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, इ. क्र. १६च्या शेजारी, काळाचौकी, मुंबई ३३ येथे “मोफत असंघटित कामगार नोंदणी शिबिर” भरविण्यात आले आहे. सदर ई-श्रम कार्ड मिळविण्यासाठी आधार कार्ड आणि बँक पासबुक यांची आवश्यकता आहे. ज्यांचे वय किमान १६ ते कमाल ५९ असेल असे नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतील. हे ई-श्रम कार्ड संपूर्ण देशात मान्य असेल. ह्या कार्डसोबत असंघटित कामगारांना एक वर्षाचा विमा सरकार तर्फे मोफत मिळणार आहे. तरी जास्तीतजास्त असंघटित कामगारांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आशीर्वाद चारीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उमेश येवले आणि प्रकल्प सहाय्यक राजेंद्र खानविलकर यांनी केले आहे.