दोनशे बेरोजगारांना मिळाला हक्काचा रोजगारतरुण उत्साही सेवा मंडळाचा उपक्रम

मुंबई : तरुण उत्साही सेवा मंडळ यांनी माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून बेरोजगार तरुण तरुणींसाठी विनामूल्य भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता.
लोअर परेल येथील बी. डी. डी. चाळ क्र. २७ व ३२ च्या प्रांगणात ह्या भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
विविध आस्थापनांचे प्रतिनिधी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी उपस्थित होते. १०वी, १२वी, पदवीधर, उच्च पदवीधर, अभियांत्रिकी, डिप्लोमा धारक युवक युवती मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते. पाच तास चाललेल्या मुलाखतीत दोनशे युवक युवतींची निवड करण्यात आली. त्यांना आयोजकांच्या उपस्थितीमध्ये आस्थापनांच्या प्रतिनिधींच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले.
रोजगार मेळाव्यास दशरथ (दादा) पवार (येसीई ह्यूमन कॅपिटल लि. – व्यवस्थापकीय अधिकारी), मयूर कदम, सिद्धेश्वर चिखले, सागर तुडे उपस्थित होते. सदर रोजगार मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी साई रामपुरकर (समाज सेवक), केशव पंदिरकर, मंडळाचे सचिव शांताराम तुरळकर, भागवान चिपळूणकर यांनी फार मेहनत घेतली होती.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com