तुलिका मानचं थोडक्यात सुवर्ण हुकलं! रौप्यपदकावर मानावं लागलं समाधान, भारताच्या खात्यात सोळावं पदक…. तुलिका मानला स्कॉटलँडच्या सारा एडलिंग्टनकडून पराभव पत्कारावा लागला.

Commonwealth Games 2022: भारतीय महिला ज्युदोपटू तुलिका मानचं कॉमनवेल्थ स्पर्धेत महिलांच्या 78 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. दरम्यान, अंतिम सामन्यात तिला स्कॉटलंडच्या सारा एडलिंग्टनकडून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात तुलिकानं चांगली सुरुवात केली. परंतु, एडलिंग्टन जोरदार कमबॅक करत सामना जिंकला. निराशाजनक पराभवानंतर तुलिकाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलंय.
ज्युदोमध्ये भारताचं तिसरं पदक
ज्युदोमधील भारताचं हे तिसरं पदक असेल. यापूर्वी सुशीला देवी लिकमाबम आणि विजय कुमार यादव यांनी ज्युदोमध्ये भारतासाठी पदकं जिंकली आहेत. कॉमवेल्थ स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सुशीला देवी लिकमाबम हिने ज्युदोच्या 48 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकलंय. 78 किलोग्राम वजनी गटात रौप्यपदक निश्चित करून देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याच्या हेतुनं तुलिका मान मैदानात उतरली होती. परंतु, अतिंम सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानं तिला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलंय.

कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकलेले भारतीय खेळाडू
सुवर्णपदक- 5 (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ.)
रौप्यपदक- 6 (संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान)
कांस्यपदक- 5 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल.)

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com