धारावीकरांची रक्तदान करून शिवसेनाप्रमुखांना आदरांजली ! धारावीत एकाच दिवसांत १००० दात्यांचे रक्तदान.

ज्या धारावी मुळे संपूर्ण मुंबईमध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्याने होईल, अशी भीती यंत्रणेला आणि मुंबईकरांना वाटत होती, त्या धारावीच्या जनतेने आज पुन्हा एकदा आपलं मोठेपण सिद्ध केलंय. धारावीतील कोरोनावर पूर्णतः ताबा मिळाल्यावर राज्यातील पहिले प्लाझ्मा दान शिबीर आयोजित करून धारवीकारांनी मुंबईच्या जनतेला मदतीचा हात दिला होता. आज पुन्हा एकदा एकाच दिवसांत १००० धारावीकर दात्यांनी रक्तदान करून मोठं पाऊल उचललं आहे. माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी_ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या २३ जानेवारी निमित्ताने धारावी विधानसभा, शिवसेनेच्या वतीने हे शिबीर आयोजित करून पदाधिकऱ्यांनी शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली वाहिली आहे. शिबिरातील प्रत्येक दात्याला प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी खासदार राहुल रमेश शेवाळे, आमदार- विभागप्रमुख सदा सरवणकर, माजी महापौर व महिला विभाग संघटिका सौ. श्रद्धाताई जाधव, आरोग्य समिती अध्यक्षा प्रविणा मोरजकर, उपाध्यक्ष वसंत नकाशे, नगरसेविका हर्षालाताई मोरे, विधानसभा समन्वयक विठ्ठलजी पवार, उपविभागप्रमुख- प्रकाश आचरेकर, शाखा प्रमुख – आनंद भोसले, जोसेफ कोळी, समाजसेवक आशिष मोरे, राजेश खंदारे, मनोहर रायबागे, रवी संकटोल आदी मान्यवर उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com