मुंबई उच्च न्यायालयाने रमजान काळात मुंबईतील जामा मस्जिद मध्ये लोकांना नमाज अदा करण्याची परवानगी देण्यास नकार दिला आहे. कोरोनामध्ये मुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. नागरिकांची सुरक्षा ही अधिक महत्त्वाची आहे, त्यामुळे मस्जिद मध्ये सामूहिक नमाज अदा करण्याची परवानगी देता येऊ शकत नाही, असे सांगत न्यायमूर्ती आर.डी. धानुका आणि व्ही.जी.बिश्त यांनी जुम्मा मस्जिद ट्रस्टची मागणी फेटाळून लावली.
रमजान महिना असल्याने मुस्लिम समुदायातील नागरिकांना जामा मस्जिद मध्ये पाच वेळा नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी ट्रस्टच्या याचिकेत करण्यात आली होती. या वेळी शासनातर्फे अतिरिक्त अधिवक्ता ज्योती चव्हाण यांनी युक्तिवाद केला.
सध्याच्या काळात राज्य शासन कोणतीही जोखीम पत्करण्याच्या मन:स्थितीत नाही. विशेषत: आगामी १५ दिवस कोणत्याही धर्मासाठी सवलत देऊ शकत नाही. धार्मिक कार्ये करण्यास अटकाव नाही; परंतु प्रत्येकाने ती आपापल्या घरी करावीत, अशी भूमिका शासनातर्फे मांडण्यात आली.
मुंबई उच्च न्यायालयाने रमजान काळात मुंबईतील जामा मस्जिद मध्ये लोकांना नमाज अदा करण्याची परवानगी देण्यास नकार दिला आहे. कोरोनामध्ये मुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. नागरिकांची सुरक्षा ही अधिक महत्त्वाची आहे.