मुंबई: नांदगाव विकास मंडळ, मुंबईच्यावतीने काल डिलाईल रोड श्रीदेव कोळंबा जत्रा कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर व मुखपट्टी लावून पार पडली. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष दिवाकर मोदी यांनी जागेच्या दैवताला आवाहन करण्यासाठी गार्हाणे घातले. त्यानंतर सर्व ग्रामस्थ व सदस्यांनी सामुहिक गार्हाणे घालून, रखवालीचे नवस फेड केले. विष्णु मोरये आणि संतोष रेवडेकर यांनी श्रीदेव कोळंबा समोर मांड मांडला.
या जत्रौत्सवानिमित्त मंडळाचे अध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी गजानन रेवडेकर यांनी सर्व भक्तांना शुभेच्छा देऊन, कोळंबा देवाची महती सांगितली.
याप्रसंगी एक भाविक सुरेंद्र माणगांवकर यांनी श्रीदेव कोळंबा ही अंधश्रध्दा नसून, ही आमची श्रध्दा आहे. आमचे अनेक प्रश्न या देवाच्या स्मरणाने मार्गी लागतात.
मुक्तांगण शिक्षकांनी या उपक्रमात रांगोळी काढून आपल्यातील कलागुणांना चालना दिली.
हा जत्रौत्सव प्रथमच ई-मीडियावर दाखविण्यात आला. त्याकरिता सूर्यकांत रेवडेकर, संतोष कोदे, मयुर रेवडेकर यांनी थेट चित्रफित दाखविण्यासाठी परिश्रम घेतले. सेक्रेटरी राजेंद्र मोरये यांच्या कल्पनेतून हा सोहळा पार पडला.
हा सोहळा यशस्वी होण्यासाठी वैशाली आयरे, जगदीश बिडये, सतिश मोरये, रविंद्र म्हसकर, वसंत राणे, सूर्यकांत रेवडेकर, राजेंद्र महाडेश्वर आणि इतर सहकार्यांनी मेहनत घेतली.
कोरोना काळात घेतलेल्या “आरोग्यत्सव” वैद्यकीय सामग्री मिळण्यासाठी व गावाला नेण्यासाठी सहयोग दिलेल्या संजीव शिरसाट व मंगेश रावराणे यांचा श्रीफळ देऊन मंडळाचे सरचिटणीस राजेंद्र मोरये व अध्यक्ष गजानन रेवडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी कोविड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी सर्वभक्तगणांनी श्रीदेव कोळंबा देवाकडे साकडे घातले.
शेवटी पुरी आणि मटणाचा महाप्रसाद देऊन जत्रौत्सवाची सांगता झाली.