इराणच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक श्री. हमीद झिकसारी यांचे कराटे खेळाडूंना मिळणार मार्गदर्शन

मुंबई : कराटे इंडिया ऑर्गनायजेशन (KIO) यांच्या मान्यतेने, कराटे-दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व इंडियन गेन्सेरियु कराटे-दो फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ व २७ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण भवन, अंधेरी (पूर्व), मुंबई येथे जागतिक व आशियाई कराटे स्पर्धेतील पदक विजेते खेळाडू व इराण देशाच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक श्री. हमीद झिकसारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंसाठी नवीन आधुनिक सराव पद्धत, गुण प्राप्त करण्याची कला, फिटनेस व स्पर्धेतील होणार्‍या इजा इत्यादी गोष्टींच्या सखोल अभ्यासासाठी सदर प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिरासाठी मर्यादित खेळाडूंना प्रवेश दिला जाणार आहे. अशी माहिती शिहान संदीप म. गाडे यांनी दिली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com