सुमित अंतिलची सुवर्ण पदकाला गवसणी…. पॅराॉलिम्पिक भालाफेक स्पर्धा

टोकियो – सोमवारी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय भालाफेकपटू सुमित अंतिलने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. सुमितने पहिल्यांदा पॅरालिम्पिकमध्ये खेळताना भाला फेकण्याच्या एफ ६४ स्पर्धेच्या दुसऱ्या प्रयत्नात ६८.०८ मीटरचा थ्रो केल्यानंतर आपल्या पाचव्या प्रयत्नात त्याने आणखी सुधारणा करत ६८.५५ मीटर भाला फेकून विश्वविक्रम केला.

पहिल्याच प्रयत्नात सुमितने ६६.९५ मीटर अंतरावरून भाला फेकला, जो एक विक्रम देखील आहे. दुसऱ्या प्रयत्नात त्याने ६८.०८ मीटर भाला फेकल्यानंतर त्याने तिसऱ्या प्रयत्नात ६५.२७ मीटर, चौथ्या प्रयत्नात ६६.७१मीटर आणि त्यानंतर पाचव्या प्रयत्नात सुमितने ६८.५५ मीटर भाला फेकला.
भारताचे टोकियो पॅराॉलिम्पिकमधील आतापर्यंतचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी महिला नेमबाज अवनी लखेरा हिने सोमवारी सकाळी सुवर्णपदक पटकावले होते. त्याचबरोबर आतापर्यंत भारताने सुमारे ७ पदके जिंकली आहेत, यामध्ये २ सुवर्णपदकांचा समावेश आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com