सोलापूर : वाको इंडिया किक बॉक्सिंग असोसिएशन व्दारा आयोजित राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा या दिनांक २१ डिसेंबर ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये ( बालेवाडी ) पुणे येथे पार पडल्या . यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आरोही स्पोर्ट्स क्लब शेटफळ ता . मोहोळ येथील खेळाडू – आदित्य विनोद सुरवसे ४८ किलो वजनी गटामध्ये भारतात दुसरा क्रमांक, अवधूत बबनराव भांगिरे याचा ६०किलो वजन गटामध्ये तिसरा क्रमांक, पृथ्वीराज रणधीर गिड्डे ३७ किलो वजनी गटामध्ये भारतात तिसरा क्रमांक आलेला आहे. या सर्व खेळाडू च्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल सर्व खेळाडूचे अभिनंदन विजयराज डोंगरे (सभापती अर्थ व बांधकाम जिल्हा परिषद सोलापूर) , निलेश शेलार – अध्यक्ष महाराष्ट्र स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन, धिरज वाघमारे , भिमराव बाळगे, इक्बाल शेख यांनी केले. तसेच या सर्व खेळाडूना मार्गदर्शन – श्रीकांत पुजारी, मोहन सोलंकर, अश्विनी वागज ,ओंकार वागज ,बिरुदेव पुजारी,सिद्धेश्वर रणदिवे यांनी केले. श्रीकांत पुजारी ज्यांनी सप्टेंबर महिन्यात गोव्यात झालेल्या सिनिअर राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे संघ प्रशिक्षक ही जबाबदारी पेलून महाराष्ट्रातील मुलांना मोलाचे सहकार्य केले होते.

Shrikant Pujari, who played the role of Maharashtra’s team coach in the Senior National Championship held in Goa in September, was instrumental in helping the children of Maharashtra.