मुंबई : मुंबई उपनगर किकबॉक्सिंग असोसिएशनच्या कॅडेट आणि ज्युनियर संघाने २९ ते ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी सुपा – अहमदनगर येथे झालेल्या “ऑल महाराष्ट्र स्टेट कॅडेट आणि ज्युनियर किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२१ आमदार चषक २०२१” मध्ये यशस्वीरित्या सहभाग घेतला आहे. एकूण
९३० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होते. मुंबई उपनगर संघाचे नेतृत्व मुंबई उपनगरचे अध्यक्ष श्री विशाल सिंग आणि सचिव श्री प्रशांत कांबळे यांनी केले ४० सहभागी आणि एकूण ३२ पदकांसह एकूण १७ सुवर्ण, ७ रौप्य आणि ८ कांस्य पदके जिंकली. मुंबई उपनगर संघ व्यवस्थापक श्री ओंकार पी मोहिते आणि मुंबई उपनगर संघाचे प्रशिक्षक श्री हिमांशू जाधव यांनी संघाला प्रशिक्षण दिले. सर्व मुंबई उपनगर प्रशिक्षक आणि प्रदीप मोहिते सर (महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षक) यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या . स्पर्धेतील सर्व सुवर्णपदक विजेते राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे