मुंबई : ऑल महाराष्ट्र स्टेट कॅडेट आणि ज्युनियर किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२१
आमदार चषक २०२१ जी किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र आणि अहमदनगर किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २९ ते ३१ ऑक्टोबर २०२१ दरम्यान सुपा – अहमदनगर येथे आयोजित करण्यात आली. आमदार नीलेश लंके हे प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेला उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्गाटनच्या वेळी खेळाडूंना प्रेरक शब्दांनी आणि मार्गदर्शनाने खेळाडूंमध्ये त्यांच्या भावी क्रीडा प्रवासासाठी अमर्याद ऊर्जा निर्माण केली. किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र या संघटने बरोबर एक पाऊल पुढे राहून मी काम करेन असे आमदार नीलेश लंके यांनी राज्य संघटनेला आश्वस्थ केले. नीलेश शेलार (वाको महाराष्ट्र अध्यक्ष) श्री.धीरज वाघमारे सर (वाको महाराष्ट्र सचिव), राजेश्वरी कोठावळे (आयोजक), श्री.अनिल मिरकर, श्री.सूर्यप्रकाश मुंडपत, रणजित काठोडे, कृष्णा ढोबळे, विशाल सिंग, सुरेश मिरकर, सतीश राजहंस, शीतल राणे, रुपेश परदेशी उमेश ग. मुरकर, संजय गाडीलकर, नितीन दादा शेलार हे मान्यवर सदस्य उपस्थित होते. सदर स्पर्धेस महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांनी सहभाग नोंदवत एकूण ८०५ मुले व मुलींनी उपस्थिती नोंदविली. मुंबई शहरातील विघ्नेश मुरकर याला या राज्य स्पर्धेत बेस्ट रेफेरी पुरस्काराने सन्मानित केले गेले, विघ्नेशने २०१९ साली तिसरे इंटरनॅशनल वाको किक बॉक्सिंगचे जज आणि रेफरिंग सेमिनार मध्ये सहभागी होऊन, आंतरराष्ट्रीय रेफरी कमिशन, रिंग स्पोर्ट्सचे अध्यक्ष युरी लखिकोव्ह आणि ततामी स्पोट्र्सचे अध्यक्ष ब्रायन ब्रेक यांच्या मार्गदर्शना खाली प्रशिक्षित झाला आहे. मुंबई विभागातून विघ्नेश वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
