एस एस के के ए चे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर संपन्न… प्रशिक्षणार्थींनी कराटे व किक बॉक्सिंग कलेचे तंत्र आत्मसात केले

मुंबई: शितो रियु स्पोर्ट्स कराटे अँड किक बॉक्सिंग असोसिएशन, स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर व गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कराटे व किक बॉक्सिंग या कलेचे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर जशन फार्म्स, पनवेल येथे संपन्न झाले, या प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांना आत्मरक्षा, मानसशास्त्रीय प्रशिक्षण व त्याच बरोबर प्रतिकार अशा प्रकारच्या बाबी शिकवण्यात आल्या शिकवण्यात आल्या. सदर प्रशिक्षण शिबिरात २१ ते २५ जून २०२२ रोजी कलकत्ता येथे होणाऱ्या कॅडेट अँड जुनियर राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेची स्पर्धा पूर्व तयारी करून घेतली, त्याचबरोबर अथीवा लाड, जेरी ब्रिट्टो, श्रेष्ठ शहा यांनी ब्लॅक बेल्ट संपादन साठी परीक्षा दिली. सर्व वरिष्ठ व कनिष्ठ कराटे च्या विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण शिबिर खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी कराटेचे प्रशिक्षक सुप्रसिद्ध उमेश गजानन मुरकर यांनी खूप मेहनत घेतली. प्रशिक्षक उमेश मुरकर व विघ्नेश मुरकर यांनी या सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे प्रशिक्षण दिले. हे प्रशिक्षण शिबिर अतिशय दिमाखदार रीतीने पार पडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रशिक्षक उमेश मुरकर यांचे आभार मानले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com