ज्येष्ठ नागरिकांसाठी गीत गायन स्पर्धा

मुंबई : स्वामी सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन अँड एन्व्हायरमेंट (स्वामी) संस्थेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ४ वर्षांपूर्वी “विरंगुळा” नावाचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमातर्फे मुंबई व आसपासच्या परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी “भव्य गीत गायन स्पर्धा” रविवार दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९ ते रात्री ८ पर्यंत भावसार सभागृह, परमार गुरूजी मार्ग, परळ, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. ज्या स्पर्धकांना स्पर्धेत सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी ३० डिसेंबर २०२१ पर्यंत मोहन कटारे ९८६९२६७०८० किंवा प्रदीप ढगे ९९२०७८२६५२ यांच्याशी संपर्क साधावा.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com