मुंबई : नुकतेच दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. सायन धारावी परिसरातील मुलांकरिता “वेध भविष्याचा” या कार्यक्रमा अंतर्गत श्री हनुमान सेवा मंडळ यांच्यातर्फे एमपीएससी युपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर हा कार्यक्रम मंडळाच्या सार्वजनिक हॉल मध्ये आयोजित केले होते, सुप्रसिद्ध मार्गदर्शक संतोष पवार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन उपस्थित मुलांना लाभले, संतोष पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी विविध शासकीय पदावर यशस्वीपणे आपले काम करीत देशसेवा करीत आहेत, सरांनी या मधील काही निवडक उदाहरणे देऊन, सर्वांनी स्पर्धा परीक्षा परीक्षा देण्यास तयारीस सुरुवात करावी असा सल्ला मुलांना दिला.
सरांचे दादर येथे ओंकार अकादमी संपर्क- ८०७०९०३२३२ प्रशिक्षण वर्ग चालू आहेत.
शालेय जीवनातच UPSC, MPSC, IIT JEE, NEET, NDA, CDS, CAT, IPMAT सारख्या सर्व स्पर्धा परीक्षांची पायाभरणी करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने ही परीक्षा दिली पाहिजे. या परीक्षेमुळे शालेय स्तरावरील इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास देखील मदत होईल. तुमचे स्वप्न मोठे असेल तर तुमच्या प्रयत्नांची सुरुवात लवकर होणे आवश्यक आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी हे नक्की समजेल व त्याचा त्यांच्या ध्येयनिश्चितीसाठी नक्की उपयोग होईल.

तसेच माननीय श्री विजय कांदळगावकर – वरिष्ठ पोलीस निरीक्षक धारावी पोलीस ठाणे यांनी मी पण आपल्या सारखाच चाळीत राहूनच व अभ्यासावर लक्ष केंद्रित करून कसे अधिकारी होऊ शकता, याचे जिवंत उदाहरण देऊन धारावीतील मुलांना त्यांच्या लहानपणातील आठवणी व त्यांनी पोलीस खात्यात मिळवलेली ही उंची कशाप्रकारे गाठली, याचे त्यांच्या वरून मुलांना प्रोत्साहन मिळेल असे उदाहरण त्यांनी विद्यार्थ्यांच्या समोर ठेवले समोर ठेवले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुणवंत कदम सर यांनी केले. सदर कार्यक्रमास श्री हनुमान सेवा मंडळा चे प्रमोद खाडे, सोमनाथ आगवणे, राजू कांबळे, नाना आगवणे, विजय खरात, प्रशांत खरात, चेतन थोरात, नितीन खाडे, नितीन कांबळे, गणेश चंद्रकांत खाडे, राहुल कारंडे, वैभव आगवणे, अजय खरात, अमोल इंगळे इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते