शिवडी राष्ट्रवादीतर्फे कॅन्सरग्रस्तांना धान्य वाटप

मुंबई : १६ फेब्रुवारी, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री मा. नामदार जयंत पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून “सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल एज्युकेशन अॅण्ड एन्व्हायरमेंट” (स्वामी) ह्या कॅन्सरग्रस्तांच्या सेवेसाठी कार्यरत असणार्‍या संस्थेला अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
त्याप्रसंगी स्वामी संस्थेच्या कार्याचा आलेख मोहन कटारे यांनी मांडला. गेली अनेक वर्षे कॅन्सरग्रस्त, रुग्ण, विद्यार्थी, आदिवासी आणि समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी स्वामीतर्फे निरपेक्ष भावनेने चालू असलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी सादर केला.
स्वामीच्या कार्याची दखल शिवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश येवले यांनी घेतली. “अतिशय छोट्याश्या जागेत मोठमोठया संस्थांनाही मागे टाकणारं कार्य आपण करत आहात. ज्येष्ठ नागरिक मिळून चालवत असलेली ही संस्था तरुणांनाही लाजवेल असं कार्य करत आहे. आपल्या ह्या कार्याने प्रेरित होऊन आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री मा. नामदार जयंत पाटील यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू आम्ही देत आहोत, त्याचा आपण स्वीकार करावा.” अशी विनंती केली.
त्याप्रसंगी शिवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विनायक भंडारे, विलास इंगळे, अरविंद घाडगे, संदीप घाटे, राजेंद्र खानविलकर, अनंत घोगळे, विकास राऊत, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष इसरार खान, प्रभाग अध्यक्ष संतोष वराडकर, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रशांत दिवटे यांच्यासोबत स्वामी संस्थेचे मोहन कटारे, विमल माळोदे, प्रतिभा सावंत, सुमंगल गुरव, साध्वी डोके आदी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी मा. नामदार जयंतराव पाटील यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक प्रार्थना केल्या.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com