कराटेचा मूळ ध्येय म्हणजे आत्मरक्षा. प्रामुख्याने एक स्टँड-अप फॉर्म आहे जो प्रॅक्टीशनर्सना शिकविते की हाताचा उपयोग करून स्ट्राइक कसे अवरोधित करावे. शालेय विद्यार्थाना, महिलांना व मुलींना शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता व त्यांच्या शारीरिक विकासासाठी शितो रियु स्पोर्ट्स कराटे अँड किकबॉक्सिंग असोसिएशन तर्फे दरवर्षी प्रशिक्षण शिबिरे राबवण्यात येतात. या संस्थेची गेल्या वर्षीची ब्लॅक बेल्ट परीक्षा कोरोना व लॉक डाउन या मुळे घेतली गेली नव्हती. ती परीक्षा व प्रशिक्षण शिबीर ११ ते १३ जानेवारी २०२१ रोजी जशन फार्म्स येथे घेण्यात आले. सोशल डिस्टंसिंग चे काटेकोरपणे पालन करून हा कॅम्प पार पडला. आलोक ब्रीद, आशिष महाडिक, पियुष विरास, विजय रामचंद्रन, अभिनया चंद्रशेकर, अफ्फान सय्यद, शुभम साहू, रॉबिन्सन नादार, अंकलेश यादव, भूपेश वैती, पियुष यादव या काराटेकानी ब्लॅक बेल्ट परीक्षा यशस्वी पणे पार पडली. या सर्वाना प्रशिक्षक शिहान उमेश गजानन मुरकर , सेन्सेई विघ्नेश उमेश मुरकर, राहुल साळुंखे, महेश जाधव, रेक्स मेलगिब्सन, शुभम आव्हाड, साहिल देवघरकर, यशराज शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. व विन्स पाटील व लक्ष्मी मुरकर यांनी सक्रिय सहभाग घेतला