मुंबई: स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर संघटनेच्या वतीने १ ऑगस्ट रोजी अहमदनगर येथे होणाऱ्या पहिल्या सिनिअर आणि मास्टर्स राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आयोजित करून मुंबई शहर किक बॉक्सिंग संघात १३ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
शुभम आव्हाड, यशराज शर्मा, भूपेश वैती, रॉबिन्सन जयराज, विघ्नेश मुरकर, आशिष महाडिक, ओम साळवी, विन्स पाटील, तेजस चौधरी, रोशन शेट्टी, लॅबिन जेम्स, राहुल साळुंखे, शुभम साहू या १३ खेळाडूंचा समावेश आहे. या राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ हा २६ ते २९ ऑगस्ट दरम्यान गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धे साठी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. निवड झालेल्या खेळाडूंना गुरुकुल कृती फाऊंडेशन ट्रस्ट व एस एस के के ए संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्पर्धेच्या पुढील सरावासाठी आवश्यक बाबी देण्यात येणार आहेत. स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर संघटनेचे अध्यक्ष उमेश मुरकर, तसेच रोहित मनोहर खैरे (युवासेना विभाग अधिकारी) (शिवसेना सोशल मीडिया धारावी विधानसभा समन्वयक), चेतन सूर्यवंशी, युवासेना विभाग समन्वयक, विनोद डोईफोडे, उपविभाग अधिकारी, सागर बोबडे, युवा सेना शाखा अधिकारी-186,अजित बागडे, अंकुर जाधव, हेमंत नाचरे, राहुल कारंडे, दीपेश गुप्ता, दिगंबर साहू, रमेश यादव यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.