वाको इंडिया किक बॉक्सिंगच्या अध्यक्षपदी संतोष अगरवाल आणि वाको महाराष्ट्र किक बॉक्सिंगच्या अध्यक्षपदी नीलेश शेलार यांची निवड

वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनची राष्ट्रीय असाधारण सर्वसाधारण सभा १३ जानेवारी रोजी संपन्न झाली, वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनची राष्ट्रीय सर्वसाधारण सभा “व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म – झूम” वर आयोजित या बैठकीत 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सदस्यांनी भाग घेतला होता.

वर्ल्ड असोसिएशन ऑफ किकबॉक्सिंग ऑर्गनायझेशन (वाको वर्ल्ड) चे अध्यक्ष श्री. रॉय बेकर, स्वतंत्र उदय कुमार सागर, स्वतंत्र अधिकृत (वकील-सुप्रीम कोर्ट, दिल्ली) आणि तांत्रिक पर्यवेक्षक श्री. रोमिओ डेसा (चेअरमन वाको वर्ल्ड टेक्निकल कमिटी, क्रोएशिया) आणि पर्यवेक्षक श्री सलीम कायिकी (व्हाईस चेअरमन वाको वर्ल्ड) यांच्या देखरेखीखाली आयोजित या बैठकीच्या अजेंड्याचा मुख्य मुद्दा, विद्यमान कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष, व्हर्निंग कौन्सिल आणि सर्व समित्या व उपसमिती विघटन करुन नवीन कार्यकारी मंडळ, गव्हर्निंग कौन्सिलची स्थापना केली जाणार होती.

विद्यमान अध्यक्ष श्री. संतोषकुमार अग्रवाल (हरियाणा), यांना २०२१ ते २०२५ पर्यंत एकमताने फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. तर महाराष्ट्र किक बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी नीलेश शेलार यांची निवड केली. बैठकीस उपस्थित वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनच्या सर्व सदस्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आणि फेडरेशनला आगामी वाटचालीस व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी वाको वर्ल्डचे अध्यक्ष श्री. रॉय बेकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनचे अभिनंदन केले. आणि गेल्या तीन वर्षात वाको इंडिया व श्री संतोषकुमार अग्रवाल यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. श्री रोमिओ डेसा यांनी भाषण करताना सांगितले की वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनचे उपक्रम आणि श्री. संतोषकुमार अग्रवाल जी यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आज आशियाई क्रमवारीत भारत अव्वल तीन देशांमध्ये स्थान मिळवतो. सल्लागार श्री सलीम किकी यांनी आपल्या भाषणात वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने भारतीय किकबॉक्सिंगपटूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com