मुंबई : गोरेगाव नगरीत संतोष अबगुल प्रतिष्ठान व जगजीवन ब्लड बँक यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते अनेक रक्तदात्यांनी त्याच प्रमाणे प्रतिष्ठानच्या सभासदांनी मिशन अभियान राबवून रक्तदान शिबिर उत्कृष्ट रीतीने पार पाडण्यात आले.
रक्तदान शिबिर अतिशय आनंददायी वातावरणात पार पडले व या ठिकाणी 117 रक्तदाते यांनी रक्तदान शिबिर साठी आपली नोंदणी केली आणि त्यापैकी 102 रक्तदात्यांनी यशस्वी रक्तदान केले प्रत्येक विभागात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमा बद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे योग्य वेळी हा उपक्रम राबविला जात असल्याने उपयुक्तता देखील वाढत आहे.
येणाऱ्या 26 तारखेला याच जोमाने नालासोपारा नगरीत मिशन 700 रक्तदाते आपल्याला पूर्ण करायचे आहे तरी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन संतोष अबगुल यांनी केले आहे.
