मुंबई: नाशिक संपन्न झालेल्या ४९ व्या राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत मुंबईच्या संपदा फाळके हिने सुवर्णपदकाची कमाई केली. ७८ किलो खाली जन संपदाने सुवर्णपदक मिळविताना ठाण्याच्या जल पुराणिकला पराभूत केले. संपादला रवींद्र पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.
७८ किलो वरील गटात मुंबईच्या शांभवी कदम ला अंतिम सामन्यात ठाण्याच्या अपूर्वा पाटील कडून हार खावी लागली. मुंबईच्या अली शेख, राहुल गोम्बाडी भूमी कोरडे यांनी या स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली.