२०२१ या नववर्षाचे स्वागत आणी पर्यावरण पुरक गडकिल्ले संवर्धनासाठी जनजागृति मोहीम संगम प्रतिष्ठान च्या आयोजनामधे व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शनामधे सुरु झाले असून १ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८.३० वाजता झेंडा फडकवून ६ सायकल स्वरांनी सायन किल्ला, काळाकिल्लाचा रेवा किल्ला, बान्द्रा किल्ला, माहीम किल्ला, वरळी फ़ोर्ट, माझगाव फ़ोर्ट ते शिवडी किल्ला. असे ८ किल्ले दर्शन आणी स्थानिकांच्या माध्यमातून पर्यावरण पुरक चर्चा करण्यात आली. या कामी अजय लालवानी या अंध जुडो खेळाडूने पुढाकार घेवून हा संकल्प सिध्हिस नेण्याचा विडा उचलला आहे.
अजयशी चर्चा करताना त्याने सांगितले कि रोज किमान एक किल्ला गाठण्याचे त्याचे ध्येय आहे. केंद्र सरकार आणी महाराष्ट्र सरकारच्या आखत्यारितील सुमारे १२०० गड, किल्ले आणी पुरातन वास्तुआज मोडकळीस आल्या असून या वास्तू हाच महाराष्ट्राचा ठेवा आहे.त्याची देखभाल, जपणूक, डागदूडूजी आणी पर्यावरण पोषक वातावरण तयार करुन महाराष्ट्रातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे पाठपुरावा केला जाईल. अशी ग्वाही राज्य सचिव कोमल तानाजी घाग यानी दिली. ही चळवळ लोकाभिमुख व्हावी यासाठी प्रदेशाध्यक्ष मा.श्री.बाळासाहेब थोरात यांचे आशिर्वाद असल्याचे कोमल घाग सांगतात.
प्रतिनिधी – उमेश मुरकर