मुंबई दि.३ जानेवारी २०२१
आज राष्ट्र सेवा दलाच्या वतीने सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन काबाडकष्ट करत प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन स्वतः घराचा आर्थिक डोलारा सांभाळून आपल्या मुलींना शिक्षण देणाऱ्या महिलांचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले
मुंबईतील भोईवाडा या परिसरातील घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान हा खऱ्या अर्थाने सावित्रींच्या लेकींचाच सन्मान आहे. सावित्रीमाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. म.फुलेंच्या सोबतीने महिलांसाठी ज्ञानदानाचे कार्य केले या सावित्रींच्या आधुनिक लेकी प्रचंड आर्थिक अडचण असतानाही मुलींना शिक्षणात काहीच कमी पडु नये यासाठी दिवस-रात्र झटत आहेत आजच्या सावित्रींना सलाम करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.तद्प्रसंगी राष्ट्र सेवा दलाचे मुंबई विभागीय संघटक चंद्रकांत म्हात्रे,सदस्या राधिका महांकाळ, छात्रभारतीचे रोहित ढाले,सचिन काकड राज जगताप हे उपस्थित होते..