उरणमध्ये रंगली रायगड जिल्हास्तरीय काव्यस्पर्धा

उरण : द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित २१ वा रायगड जिल्हास्तरीय युवा महोत्सव २ ते ६ जानेवारी २०२२ या काळात उरण येथे रंगणार आहे. सलग ५ दिवस विविध स्पर्धांचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष महादेव घरत यांच्या कुशल नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. स्पर्धांसोबतच दिव्यांगांना व्यवसायासाठी लागणार्‍या कागदपत्रांचं शिबिर, विज्ञान प्रदर्शन, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, पाककला आणि मेकअप मोफत प्रशिक्षण असे महत्वपूर्ण उपक्रमही राबवले जात आहेत. राष्ट्रीय स्पर्धेच्या ताकतीचं नियोजन करताना द्रोणागिरीच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिवसरात्र घेतलेली मेहनत भव्य पटांगणात गेल्यावर जाणवते. कोरोना संदर्भात सरकारी आदेशांचं पालन करताना सर्वच स्पर्धक, दर्शक आणि रसिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
श्रीवर्धन येथून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार्‍या मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटनाच्या शानदार सोहळ्यानंतर २१व्या युवा महोत्सवाची सुरुवात झाली. संध्याकाळच्या सत्रात जिल्हास्तरीय काव्यस्पर्धेने महोत्सवात रंगत भरली. सदर काव्यस्पर्धेत अनेक स्पर्धकांनी आपल्या कवितांचे उत्तम सादरीकरण केले. आजी किंवा आजोबा, शेतकरी आणि पोलीस ह्या विषयांवरच्या रचना अर्थपूर्ण व बहारदार शब्दांनी सजल्या होत्या. स्पर्धेचे अध्यक्षस्थान युवा महोत्सवाचे अध्यक्ष महादेव घरत यांनी भूषविले. त्यावेळी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे सर्व मान्यवर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. जाणकार काव्य रसिकांची उपस्थिती सदर स्पर्धेला लाभली. परीक्षक म्हणून साहित्यिक पत्रकार गुरुदत्त वाकदेकर आणि अनुज केसरकर यांनी स्पर्धेचे चोख परीक्षण केले. काव्यस्पर्धेचे संयोजन संजय होळकर, भ. पो. म्हात्रे, रमणिक म्हात्रे आणि स्पर्धा प्रमुख व मुख्य सूत्रसंचालक कविश्री अरुण दत्ताराम म्हात्रे यांनी उत्तम प्रकारे केले.

काव्यस्पर्धेचा निकाल

प्रदीप दत्ताराम बडदे – माणगाव (प्रथम), हेमाली बगाराम म्हात्रे -कोप्राली (द्वितीय), अमोल रामचंद्र गोळे – ढालकाठी (तृतीय), सुचित्रा अशोक कुंचमवार – द्रोणागिरी (चतुर्थ), उत्तेजनार्थ १- रमेश नारायण पाटील – तांबडशेत २- अंजली अनंत कोळी ३- समीर शंकर म्हात्रे – कळंबुसरे ४- अनिल विनोद भोईर – जसखार असे एकूण ८ क्रमांक काढण्यात आले. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र तसेच सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत, दिलीप तांडेल (सचिव), अरुण द. म्हात्रे. (स्पर्धा प्रमुख), स्पर्धा संयोजक संजयजी होळकर,
भ. पो. म्हात्रे यांनी सर्व विजेत्यांचे, सहभाग धारकांचे आणि काव्य रसिकांचे आभार मानले आणि ६ जानेवारी पर्यंत चालणार्‍या या महोत्सवात सहभागी होण्यासाठी आवाहन केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com