कलाशिक्षक ज्ञानेश्वर माळी रेखांकित ‘शतचित्राणी’ पुस्तकाचे प्रकाशनसंपन्न

दिं १० आँक्टोबर – पालघर येथील म .नी. दांडेकर हायस्कूल शाळेचे सुप्रसिद्ध कलाशिक्षक श्री. ज्ञानेश्वर कौतिक माळी यांच्या रेखांकित ‘शतचित्राणी’ या पुस्तकाचे प्रकाशन झी 24 तास मराठी न्युज चैनल च्या वृत्तनिवेदिका व सीनियर पत्रकार माननीय अनुपमा खानविलकर यांच्या शुभहस्ते प्रकाशन झाले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुंबई येथील आर्यन एज्युकेशन सोसायटीचे सी.ई.ओ.श्री.अविनाश म्हात्रे व प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्ह्याचे खासदार माननीय राजेंद्रजी गावित साहेब व तसेच मुंबई विभागाचे सहाय्यक शिक्षण उपसंचालक माननीय राजेश कंकाळ साहेब , ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र महाजन सर , शांती नगर पोलिस स्टेशनचे भिवंडी- ठाणे शहरचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर कानडे , पालघर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढीचे अध्यक्ष संतोष पावडे तसेच गणेश प्रधान, गुरुकुल एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद पाटील , पालघर कलाध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल घरत, पालघर भारत स्काऊट अँड गाईडचे जिल्हा कोषाध्यक्ष रविंद्र नाईक , दर्शन भंडारे ,नामदेव कवळे ,तसेच मित्रपरिवार , शिक्षक बंधू-भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल घरत यांनी केले; तर पुस्तकाचे परीक्षण जगन्नाथ घरत सर यांनी केले. सदर पुस्तकात शंभर प्रतिष्ठित व्यक्तींची रेखाचित्रे रेखांकित केलेली आहेत .
सामाजिक दायित्व व कलेतील योगदान देत श्री. ज्ञानेश्वर माळी यांनी सामाजिक व राष्ट्रीय कार्यास हातभार लावलेला आहे . चित्रातून मिळालेला मोबदला श्री. ज्ञानेश्वर माळी यांनी कोरोना महामारीसाठी मदत निधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला होता. शतचित्रांणी या पुस्तकाला अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी हे प्रकाशक म्हणून लाभलेले आहेत. शतचित्राणीचे मुखपृष्ठ श्री ज्ञानेश्वर माळी यांचे रेखाचित्र प्रा. उर्मिला दुरगुडे यांनी रेखाटले आहे .तसेच खासदार ,मंत्री ,शासकीय उच्च पदाधिकारी ,कलाशिक्षक व समाजसेवक आदिंच्या शुभेच्छा लाभलेल्या आहेत .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रतिभा कदम व जतिन कदम या उभयतांनी केले. पालघर येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहामध्ये हा प्रकाशनाचा समारंभ सोहळा संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com