धारावीत स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम – धारावी पोलीस ठाणे, मोहल्ला कमिटी, महिला दक्षता कमिटी, पोलीस मित्र व निर्भय पथक यांचा सहभाग

मुंबई : दिनांक२५ डिसेंबर २०२२ रोजी धारावी पोलीस ठाणे तसेच मोहल्ला कमिटी महिला दक्षता कमिटी पोलीस मित्र व निर्भय पथक यांच्या संयुक्त विद्यमानाने अशोक मिल नाका संत रोहिदास मार्ग ते आकाशगंगा बिल्डिंग ९० फूट रोड असा स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम सकाळी दहा वाजता राबविण्यात आला सदर कार्यक्रमास आम्ही स्वतः तसेच निर्भया पथकाच्या प्रमुख वैशाली बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक, गणेश इघे, नंबर एक गाडी, बीट मार्शल एक दोन तीन सर्व बीट अंमलदार व कार्यालयीन कामकाज करणारे अमलदार हजर होते तसेच सदरचा कार्यक्रम पूर्ण करण्यास मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी यांनी स्वच्छ मुंबई स्वच्छ भारत अभियाना करिता महत्त्वाचे मदत केली. तसेच बीएमसी चे अधिकारी गडकरी व थोरात हजर होते, विजय कांदळगावकर -वरिष्ठ पोलीस निरीक्षक, धारावी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com