सीनियर नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेत प्राप्ती रेडकर हिला सुवर्ण तर विघ्नेश मुरकर याला कांस्यपदक

जवाहरलाल नेहरू क्रीडा संकुल, चेन्नई येथे
दिनांक १८ ते २२ रोजी झालेल्या वाको इंडिया सीनियर नॅशनल किकबॉक्सिंग स्पर्धेत मुंबई शहर तर्फे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना प्राप्ती रेडकर हिने महाराष्ट्रासाठी सुवर्णपदक पटकावले, तर विघ्नेश मुरकर याने कांस्यपदकाची कमाई केली. मुंबई शहराकडून अथर्व घाटकर व साहिल बापेरकर यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.
प्राप्ती रेडकर के सी कॉलेज, चर्चगेट मध्ये शिकत आहे तर विघ्नेश मुरकर एस आय इ एस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सायन मध्ये शिकत आहे. या स्पर्धेसाठी स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर अध्यक्ष उमेश मुरकर यांचे प्रशिक्षण या सर्वांना लाभत आहे. राष्ट्रीय स्पर्धेच्या तयारीसाठी शितो रीयु स्पोर्ट्स कराटे अँड किक बॉक्सिंग असोसिएशन व गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट या संस्थांचेही या खेळाडूंच्या प्रशिक्षणाकरता महत्त्वाचे योगदान प्रशिक्षणार्थींना मिळाले आहे, वाको इंडियाचे अध्यक्ष संतोष अग्रवाल यांनी विजेत्या खेळाडूंना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

प्राप्ती रेडकर ही बालकलाकार असून तिने क्राईम पेट्रोल सारख्या अनेक मराठी व हिंदी सिरीयल मधून काम केले आहे. किक बॉक्सिंग मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा व एशियन स्पर्धेत सहभाग नोंदवून सुवर्ण पदक पटकाविण्याचा मानस या प्रसंगी प्राप्तीने बोलून दाखविला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com