कोरोना महामारी मुळे ST महामंडळाला कमी प्रवाशांमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. यातून बाहेर येण्यासाठी व प्रवासी भारमान वाढवण्यासाठी ST महामंडळाकडून महाराष्ट्रातील सर्व आगाराना पॅकेज टूर आयोजित करण्याविषयी सूचना करण्यात आल्या होत्या त्याप्रमाणे गुहागर आगारातील कर्मचाऱ्यानी स्वखर्चाने सदर योजनेला सुरुवात केली असून अधिकाधिक प्रवाशांनी ST महामंडळाकडून आयोजित *पॅकेज टूर * या योजनेचा आनंद घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक वैभव कांबळे यांनी केले आहे.